भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Monday, February 22, 2010

दाटून कंठ येतो...

5 comments
           ज्या लोकाना ही पोस्ट वाचावी अस वाटल त्याना हे गाण म्हणजे वसंतराव देशपांडेच्या बद्दल मी काहीतरी लिहिणार आहे, अस वाटल असण्याची शक्यता नाकारता येणार नाही! मला या गाण्याविषयीच काहीतरी सांगायचय, पण त्या अनुषंगाने मला त्या गाण्यामागचा गर्भीतार्थ अधोरेखित करायचाय...
           मुलीच्या लग्नावेळी तिच्या वडीलाची झालेली अगतिकता शब्दात व्यक्त करण्यासाठी या गाण्यापेक्षा कुठलेही गाणे सरस ठरू शकनार नाही, अस मला वाटत. आपल्याकडे, मुलगी ज्यावेळी जन्माला येते, त्यावेळी ती दुसर्‍याच घरची म्हणून येते!  नंतर तिच शिक्षण वै. पूर्ण झाल नि ती संसार करन्यासाठी योग्य झाली की तिच्या वडिलाना चाहूल लागते, ती तिच्या लग्नाची. हातात वाढलेली पोर दुसर्‍या घरी सोडून जाणार, नि तीही कायमची, या विचाराने बापाच मन व्याकुळ होऊन जात; पण कर्तव्य हे करावच लागत.
          तिला घर चांगल मिळेल का, नवरा चांगला मिळेल का, मिळकत चांगली असेल का, आपली मुलगी सगळ व्यवस्थित निभावेल का, असे एक ना अनेक प्रश्न बापाला सतावू लागतात. नंतर अनेकविध स्थळे पाहून झाली की सुयोग्य मुलगा ठरतो, नि बघता-बघता घराच लग्नघर होऊन जात. पाहुण्यांची गडबड, घरोघरी द्यावयाची आमंत्रणे, सगळी घाई चालू होते..पण मुलीच्या बापाच्या मनाला काही उसंत नसते! सगळ काही व्यवस्थित पार पडेल ना, कुठे कमी राहणार नाही ना, पाहुण्यांचा मान-पान नीट होईल ना, आपण केलेल सगळ नवरा मुलगा गोड मानून घेईल ना यासारख्या प्रश्नांची वरचेवर मनात भाउगर्दी होत असते. शेवटी 'लग्न पहाव करुन' अस उगिच म्हटल आहे?
         सगळ काही जुळून येत नि लग्नाचा दिवस उजाडतो; ठरलेल्या वेळी अक्षता पडतात, नि मागे एखाद्या कोपर्‍यात उभ राहून मुलीचे वडील अतिशय जड अंत:करनाणे मुलीच्या डोक्यावर अक्षता टाकतात. एकीकडे कर्तव्य पार पाडल्याचा आनंद तर दुसरीकडे बाप-लेकीच्या होणार्‍या ताटातूटीच दु:ख!
         नंतरची वेळ प्रत्यक्ष ताटातूटीची...मुलगीला नेहमीचे समजूतदारपनाचे चार शब्द सांगून बाप निरोप घेतो, माघारी फिरतो नि...काय असेल त्या मुलीच्या बापाची त्यावेळी स्थिती? आणखी इथेच हे गाण सर्व काही सांगून जात......मुलीचा बाप म्हणतो,


'घेऊ कसा निरोप, तुटतात आत धागे
हा देह दूर जाता, मन राहणार मागे
धन आत्मजा दुजाचे ज्याचे तयास देणे
परक्या परी आता मी, येथे फिरुनी येणे....'


           ईतक काही करुन शेवटी परकेपणा घेऊन एक प्रेमळ बापच मागे फिरू शकतो; या जगातील तमाम मुलीना मला फक्त ईतकच सांगावस वाटत, की आई-वडीलांच्या या त्यागाला त्यानी आयुष्यभर लक्षात ठेऊन संसार करावा.
           आजच्या पिढीच्या अनेकानी जर वरील नमूद केलेल गीत ऐकलेल नसेल, तर त्यानी ते जरूर ऐकाव...






जय महाराष्ट्र!