भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Thursday, March 25, 2010

ग्रीष्मातली ती दुपार....

1 comments
ग्रीष्मातली ती दुपार....
त्या र्नळीवृक्षाची सावली मला आठवते
अन् आठवते ती मोहक पानांची सळसळ,
णू माझ्याचसाठी असलेली...एकेकाळी!

         डोक्याशी भणभणार्‍या त्या अगणित सूर्यकिरणाना
         क्षणात गारवा देणारी,
         अन् माझ्याचसाठी उभी ठाकलेली 'ती' प्रचंड हिरवाई
         आठवते...

माझ्या मनातील तगमगीला शांत करणारी,
आणि देहभान हरपून माझ्यात सामावणारी
ती हिरवाई....आठवते

         उफाळून वाहणार्‍या घर्म ग्रंथीना
         क्षणात सुकवून आधार देणारी,
         अन् मोबदल्यात काहीच न मागणारी
         ती हिरवाई...आठवते
              
दूरवरून फक्त जिच्याकडे आशाळभूतपणाने आलो,
अन् माझ्या आशा पूर्ण करण्याच्या उद्देशाने झालेली
तिची 'फडफड' आवाज करणारी 'धडपड'
आठवते....

         तिच्या गर्द सावलीतून निघताना,
         मला कृतघ्नपने निघून जाताना
         पाहणारी ती...पण काहीच न बोलणारी!
         तसाच मागे न पाहता निघालेलो मी,
         अन् ती प्रचंड तगमग तिच्या मनाला वेढलेली
         आठवते...

त्या वृक्ष-सावित्रिची 'ती' मनमोहक अदा
अन् आज पाहतोय 'ती' भकास अवस्था,
प्रत्येक गळणार्‍या पानामध्ये
साठवलेली माझी आठवण,
अन् मदतीसाठी मला दिलेली आर्त हाक...

         मी आज पुन्हा 'त्याच' सावलीच्या आशेने
         तिच्याकडे आलेला,
         पण आपले दारिद्र्य उघड्यावर पडलेले पाहून,
         माझ्याकडे शांत पाहत उभी असलेली 'ती'
         आठवते....!

Wednesday, March 17, 2010

का थांबली तू अशी आज वेडे...

0 comments
का थांबली तू अशी आज वेडे
पाउल का तुझे हे उगा धडपडावे!


नाही फसविले तू कधी ना कुणाला
कुणाच्या जिवाची तुज सांग चिंता?
ज्याला असे ना पर्वा दु:खाची
का मग तुला ही भीती भेडसावे?


अंतरीच्या सगळया गाठी सोडताना
नव्हता न कसला विचार ठायी,
का मग कुणाच्या हातात हात
देताना तुजला मी न आठवावे?


दिलेली ती वचने अन् बाकी सारे
नसशील का तयांचा कधी विचार केला,
कुठल्या क्षणी मग सांग आज मजला
सुचले स्वप्न तुजला मला सोडण्याचे?

कुणाच्या सुखाचे कुणाला न् नसते
म्हणायचीस मजला कधी कोणे-काळी,
म्हणालोही तुजला नसते असे हे,
परी आज तेच माझ्यावरी ओढवावे?