भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Saturday, January 16, 2010

आपली संस्कृती आणि आजची पिढी...

विषय थोडा क्लिष्ट आहे; अनेकाना न रूजनारा! न्हणूनच, पहील्यांदाच स्पष्ट करत आहे की, कुणालाही दुखावण्याचा हेतू नाही. प्रत्येकाच मत विभिन्न असु शकत या विषयवरती!
तर या विषयाला हात घालण्याचं कारण म्हणजे, अगदी परवा परवाच एक गोष्ट घडली; मी आणि माझे सहकारी असे दोघेजण मिळून चहा घेण्यासाठी म्हणून एका चहाच्या टपरीवर गेलो. दोघानि चहा घेतला, पैसे देऊन मागे वळलो; समोर एक तिशीच्या आसपासची तरुणी उभी! चेहरयाच्या ठेवणीवरुन आणि परिवेशावरुन तरी चागल्या मराठी घरातील वाटत होती. वाटत होती कसली, होतीच मराठी! ती मराठीतून आपल्या सहकारी मित्राशी बोलत होती! एका हातात एक भलं मोठ सिगरेटच पाकीट आणि दुसर्‍या हातात एक अर्धवट जळालेली सिगरेट घेऊन बिनधास्तपणे कपनीच्या कटयावर बसली होती. मला आधी २-३ मिनीटे काही सुचेना, पण लगेच स्वतःला सावरलं. अशा गोष्टी नित्यनियमाच्या झाल्याने, कुणालाही त्याचं फारसं वाटेनासं झालंय हेच खरं! समोरून २-३ कामकरी बायका कामावरुन घरी निघाल्या होत्या. त्यातील एक स्त्री म्हणाली, "अगा बया, ही बया बघा बापयावानी सिगरेट ओढायल्यानी!" आम्ही(मी आणि माझे सहकारी) एकमेकांकडे पाहून हसलो आणि निघालो पुन्हा कामावर!!
आजच्या धकाधकीच्या जीवनात पैशाच्या मागे धावताना आपण पाश्छिमात्यांच इतकं अनुकरण करु लागलो की, ते आज आपल्याच मानगूटीवर बसू पाहत आहे. बहुराष्ट्रीय कंपन्या आल्या, त्याबरोबर त्यांची विचारसरणीही घेऊन आल्या; आज आपल्याला गुढीपाडव्यादिवशी घरी गोडधोड खाण्यापेक्षाही ३१ डिसेंबरला नंगानाच करत नव्या वर्षाचं स्वागत करण्यात धन्यता वाटते. पण याचेही स्त्रोत आपणच आहोत, हेही तितकच खरंय! कारण स्पर्धेच्या नावाखाली आपण आपल्या मुलाबाळांचे इतके लाड केले की, आपल्या मनाविरुध होणारी एकही गोष्ट पचविण्याची हिम्मत त्यांच्य़ामध्ये उरली नाही. याला त्यांचा निरागसपणा म्हणावं की आपल्याच लाडाने आलेला माज? संस्कृती-रक्षण वैगैरे खूप लांबच्या गोष्टी झाल्या, पण संस्कृती म्हणजे काय हेच या मुलांना उमगलेलं नाहीए, ही आपल्याच लाडाने केलेली आपल्याच संस्कृतीची हत्या नव्हे काय?
पूर्वीचा काळ म्हणजे अगदी स्त्रिया डोक्यावर पदर घेऊन वावरायच्या तसा इथे अभिप्रेत नाहीये, पण मूलं-बाळं तान्ही असताना जर त्यांच्यासमोर वर नमूद केलेल्या स्त्री सारखे आदर्श असतील, तर ती पुढे ज़ाऊन राष्ट्राचं भविष्य काय उज्ज्वल करणार? आजही एकीकडे दिवेलागणीची वेळ झाल्यावर देवघरात दिवा लावणारी स्त्री आपल्याच देशातली; नि दुसरीकडे रात्री १२-१२ पर्यन्त घराबाहेर रहणारी स्त्री सुदधा आपल्याच देशातली!! कामाचं स्वरुप बदललं, तशा कामाच्या वेळाही बदलत गेल्या; मान्य! पण आपली ममत्वाची नैसर्गिक भावनाच विसरून जर स्त्रिया असं वागू लागल्या, तर त्यांच्या घरच्यांनी मानसिक आधार शोधायचा कुणाकडे?
वेळेच्या बंधनाचाही तसा तितकासा उहापोह नाहीये; पण बाहेरून आलेल्या नीतीमत्तेचा किती प्रमाणात अंगिकार करायचा, हे तरी किमान आपल्या हातात आहे! बाहेरील, विशेषतः पाश्चिमात्य देशात अशा गोष्टीना कायदेशीर मान्यता आहे, कारण ती त्यांची संस्कृती आहे. त्या लोकाना आपल्याला मिळणार्‍या मोबदल्यापेक्षाही आपल्या संस्कृतीवरचं प्रेम लाखमोलाचं आहे. मग ते आपल्याला का असू नये? कुठचाही हौलीवूडपट बघा, पूर्ण चित्रपटात किमान एकदातरी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रध्वज दिसेल. भिंतीवर, टेबलावर, कपड्यावर, मोटारींवर जिकडे-तिकडे फक्‍त राष्ट्रध्वज दिसेल! इतक्या छोट्या-छोट्या गोष्टीवरुन त्यांचा राष्ट्रभिमान जागा होत असेल, तर खरोखरंच ते महासत्ता म्हणून मिरवण्याच्या लायकीचे आहेत! संस्कृतीप्रेम हेच त्यांच्या यशाच गमक नव्हे काय?
आपणसुधा २०२० सालापर्यन्त महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत. मग त्या दृष्टीने वाटचाल करण्याऐवजी आपण कधीपर्यन्त ईतरांच अनुकरण करत बसणार आहोत? आपण जे इतरांच्या जीवावर नाचत आहोत, ते आउटसोर्सीगच जर बंद झाल तर काय माती खायची इथल्या युवकानी? देशाला महासत्ता बनविण्यासाठी आवशकता असते ती काहीतरी करून दाखवण्याची ईछा असणार्‍या भारलेल्या मनांची!! आणखी हे ध्येय साध्य करण्यासाठीचं बळ जर आपली संस्कृती देत असेल तर का म्हणून तिच्या अब्रूची लक्त् र अशी वेशीवर टांगायची? त्या स्त्री बद्दल इतकी तेढ वाटण्याचं कारण म्हणजे, ती मराठी विवाहिता होती. ग्रामीण भागात अजुनसुधा पोटाला चटका देऊन मराठी घरात तेलाची वात लावली जात असताना, पैसा जास्त झालेने अशी स्वतःच्याच आयुच्याची आणि पर्यांयाने संस्कृतीची वाताहत करून घेणे कितपत योग्य आहे?

11 comments:

Anonymous said...

Nice One!

linuxworld said...

manatale bolalat bhaga......

सागर said...

Chalaychach....

Gangadhar Mute said...

समाजात अपवित्र गोष्टी वाढीला लागल्यात आणि त्याचा बंदोबस्त करायचा तर घनाचे घाव घालावेच लागतील.मग कुणाला आवडो वा नावडो.चिंता कशाला करायची? पुढील लेखनास शुभेच्छा..!
गंगाधर मुटे.

Anonymous said...

अगदी बरोबर आहे.

Bajeerao said...

Today's young generation with their adoption about Western culture has already put shameful spots on our society and Indian culture.
As they think that being a modern is the life but they are forgetting that previously whenever parents become old in their age, Son used to take care of them but now even the Person after getting in college feeling shame to call his/her father Dad in front of his/her friends because father is a farmer but they are forgetting the feed is only provided to them by that farmer who has worked in that desert only to give to his children.

What a shameful young generation going in a way about their culture and ....................?

Sagar said...

मी ही सहमत आहे..
अजुन ही लिहिता येईल या विषयावर...

नारायण पवार said...

Yavarun .. aathavale.. mala baryach divsapasun ak vyangachitrya kaDhayche hote..
te ase..
purvi sriya.. dokyapasun payaparyant.. jhakalelya asayachya.
nantar padar gela... nantar sari geli.. nantar bahya gelya..nantar.. nantar pant.. hi aakhud zale.. aan ata.. phakta doke zaakalele.. baki sagle mokale aashi vel yeu naye mhanje zale...

aaplya lekhanash shubhechaay...........

Sanket said...

Cigarette पिण्याच्या वाढत्या प्रमाणाबद्दल बोलत असाल तर मीही सहमत आहे पण इथे तुम्हाला एक मुलगी cigarette पितेय याचे जास्त दु:ख झालंय असं मला वाटतं (at least या लेखावरून). हा दुटप्पीपणा नाही का? मराठी मुलांनी cigarette पिली तर आपली संस्क्रुती खराब होत नाही का?!

अपर्णा said...

एक आठवण सांगते मी लहान असताना माझ्या मामाकडे जी आदिवासी जोडपी घरकाम, शेतीकामाला यायची त्या बाया आणि बाप्ये काम झालं की वाड्यात बसुन एकत्र बिडी ओढायचे..खूपदा संध्याकाळी घरी परतताना दोघांची विमानं देशी पिऊन वर गेलेली असत..आता ही आपली संस्कृती का हा प्रश्न दुय्यम..माझ्या मते हे उदा. चुकीचं आहे..मला जितका वैताग मुलींना सिगरेट ओढताना पाहिलं की येतो तितकाच मुलांनी सिगरेट पिताना पाहिलं की येतो...खरं तर जेव्हा मुली घराबाहेर मुलांइतकेच कष्ट करून. त्यांच्याइतकेच किंवा जास्त पैसे कमवुन येतात आणि तरी घरच्या गाड्याला जुंपतात तेव्हा कुठे गेलं स्त्रीदाक्षिण्य असा प्रश्न पडला पाहिजे...असो...

आशिष देशपांडे said...

Aprna, apan Gairsamaj karun ghetlela Distoy; Mala Stri-Purush yanchyabaddal kahich nahi bolayachay...Majhya ekandarit likhanavar jar tumhi aankhi ekda drushtikshep takalaat tar tumahala disun yeil mala kay mhanaychay...Mala Fakt ya post madhun yevdhach sangayach hota ki Purush mandalini tari 'manachi' sodalelich aahe pan nidan striyani tari ase vagu naye...Mala striyabaddal kahi rosh nahiye! Yvasan kay kunihi kela tari vaiitach aahe...Fakt tyache parinam aaplya pudhchya pidhyanvarati hotahet evadhach sangayacha hota! Aplya pratisadabaddal dhanywad!!