माझ्या छोट्याशा घरात आपलं स्वागत!
अनेकदा वाटायचं, आपलं असं एखादं संकेतस्थळ असावं, जिथे आपल्याला आपले विचार मांडता येतील.
काही गोष्टी अशा असतात की ज्यामुळे मनाचा खूप कोंडमारा होतो. त्या गोष्टी इतरानी मानल्या म्हणून आपणसुद्धा मानल्या पाहिजेत असं नाहीये, आणि हीच भावना या ब्लॉग च्या सुरवातीस कारणीभूत ठरली.
'मराठी' विषयी अतिशय आदर व निष्ठा! लहानपणापासून मराठी साहित्याची आवड.
माझे आदर्श मा. राजजी ठाकरे! त्यांच्याबद्दल इतकंच सांगावसं वाटतं की, 'या सम हाच'!! मला अभिप्रेत असलेलं राजकारण आज शिल्लकच राहिलेलं नाहीये, अशी माझी भावना! त्यामुळे राजकारणाबद्दल अत्यंतिक द्वेष. माझा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नाहीये; मात्र मा. राज ठाकरे यांच्या वैचारिक प्रगल्भतेला मनापासून दाद द्याविशी वाटते.
माझे विचार सर्वाना पटतीलंच असे नाही. कुणालाही माझ्या कुठल्याही पोस्टबदद्ल काही चांगलं-वाईट लिहायची ईछा झाल्यास, त्यानी खालील 'Post a Comment' या पर्यायाचा वापर करुन आपली प्रतिक्रिया अवश्य नोंदवावी, ही विनंती!
जय महाराष्ट्र!!
0 comments:
Post a Comment