भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Wednesday, January 26, 2011

काहीतरी करायला पाहिजे...

3 comments

     आज संध्याकाळची गोष्ट! मी ऑफिसला निघालो होतो. डांगे चौकात सिग्नल लागला म्हणून थांबलो. लगेच माझ्या पुढेच उभा असलेला एक ट्रॅफिकवाला माझ्याकडे आला. त्याच त्याच कायमच्या गोष्टी..लायसन्स आहे काय, गाडीची कागदपत्रं वै.वै.

मला म्हणाला, "PUC?"..मी म्हटलं "नाही!". लगेच "साईडला ये" म्हणाला. मी गेलो.

मग नेहमीचं Negotiation चालू झालं..पहिल्यांदा १०००, नंतर ५००, नंतर ३००...

शेवटी मला म्हणाला, "तू किती देऊ शकतोस?"

मी म्हटलं "५०"! त्याला असा राग आला की, जसा काही मला मारुनच टाकणार होता.

मला म्हणाला, "मग ठीक आहे...PUC नसताना १००० रु दंड भरावा लागतो..तो भर आणि लायसन्स घेऊन जा".

मी म्हटलं, "ठीक आहे. माझी बाइक पण घेऊन जा." मी ठरवलं होतं, की ऑफीसला आज मस्त दांडी मारायची पण याची वाटच लावायची.

मग पुन्हा आला...मला म्हणाला, "देऊन टाक आहेत तेवढे!" बहुतेक माझी पण वेळ आज वाईट होती...बरोब्बर पाकीट उघडलं आणि १०० ची नोट बाहेर दिसली. मग तो जरा जास्तच नाटक करू लागला. तोपर्यंत ऑफिस मधून बॉसचा फोन! मी विचार केला पुन्हा कधीतरी याला बघू...शेवटी आपली सुद्धा चुक आहेच. फक्त आळसापोटी PUC नव्हतं काढलं, आणि शिक्षा भोगावी लागली. पहिल्यांदा जाउन PUC घेतलं! असो.

तर या निमित्तानं सांगायचं हे आहे की, पार्ट्या करून २००० गेलेलं काही वाटत नाही हो; पण या हरामखोराना फुकटचे १०० जरी दिले की फार वाईट वाटतं. कदाचित माझ्यासारखीच अनेक लोकांची हाय लागत असेल साल्याना.

माझ्याकडे होते पैसे म्हणून दिले, ज्याच्याकडे नाहीत त्यानं काय करायचं? कायदे पाळले पाहिजेत, पण या भ्रष्ट लोकाना कळणार कधी आणि कसं? हा ईतिहास आहे की जर तुम्ही System बदलायला गेलात तर System च तुम्हाला बदलून टाकते. पण शेवटी नालायक System च्या विरोधात गेलो नाहीत, तर उद्या आम्ही 'आम्ही' राहू शकणार नाही; मी आता ठरवलंय या आणि अशा अनेक गोष्टीना वाचा फोडायची. ते सुद्धा अगदी कायद्यात राहून!! आणि शेवटी नाहीच जमलं तर आहेच की आपला 'आखरी रास्ता'! आणि आम्हाला जवळून ओळखणार्‍याना माहीतच आहे, की तो 'आखरी रास्ता' काय आहे ते! लिखाणाच्या माध्यमातून सुद्धा माझा पुढील काही दिवस याच विषयावर भर राहील. बघुया आम्हाला बदलता येता की नाही ते System ला. शेवटी साथ तुमच्या सारख्या हितचिंतकांची हवी आहेच!! भेटू लवकरच........

Tuesday, January 11, 2011

बेरोजगारांची "आईटी"!

2 comments
         परवाच एक मित्र भेटला. काही दिवसापूर्वी मला त्याने त्याचा Resume Forward केला होता. मी काही करू शकलो नाही त्याच्यासाठी, पण असच बोलणं सुरू होता आमचं या विषयावरती. 'किती दिवस बसून राहायचं असं', हा ओघ त्याच्या बोलण्यातून मला जाणवला होता. मी असाच विषय-परिवर्तन करण्यासाठी काही इतर विषय काढले, पण शेवटी काही त्याच्या बोलण्यातून 'जॉब'चा विषय जाईना! मग मी सुद्धा त्याच विषयावरती बोलू लागलो.
      
         IT Sector मध्ये काम करायला लागून मला चार वर्षे झाली, आणि IT तील Recruitment सुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे, पाहत आहे. आपल्याकडे (India) Software मध्ये नोकर्‍यांची इतकी वानवा का निर्माण झाली? त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या पालकांची मानसिकता! आपल्या देशात लोकाना एक सवय आहे; कुणीतरी काही तरी केलं आणि त्यामध्ये यशस्वी झालं रे झालं, की लगेच आपापल्या पाल्याना तोच अभ्यासक्रम करण्यासाठी 'भाग पाडायचे'!  मी 'भाग पाडायचे' एवढ्यासाठी म्हटलं कारण आपल्या इथे जास्तीत जास्त (सगळे नव्हे) पालक आपल्या पाल्यावर अभ्यासक्रम 'लादत'च असतात. मग नाइलाजास्तव मुलं कशीबशी तो पूर्ण करतात आणि जॉब करायला बाहेर पडतात.

         चार-पाच वर्षांपूर्वी IT मध्ये अशी काही बूम आली, की उठला-सुठला ITच च. शिक्षण घेऊ लागला. मग कॉलेजेसची डोनेशन्स सुद्धा वाढली. खास आईटी साठी कोटा वाढु लागला. आणि इथेच माशी शिंकली.  जो तो आईटी साठी मरू लागला. ईर्षाच चालू झाली आईटीत कामे करण्याची! ईतकेच नव्हे, तर मूलीना स्थळे पाहतनासुद्धा पालक आईटीतील मुलाचाच हट्ट धरू लागले. याचंच रुपांतर भल्या मोठ्या बेरोजगारीत झालेलं आपल्याला आज दिसतय.

         आज आईटीत काम करण्यासाठी लागणार्‍या eligibility criteria मध्ये समाविष्ट केलेले अभ्यासक्रम असे आहेत... BE(Computer Science & IT), Diploma(CS & IT), BCA,BCS,MCA,MCS,BSc(Comp),MSc(Comp),MBA(IT)! आणखी हे सर्व सोडून तुम्ही कोणत्याही शाखेचे इंजिनियर असाल (e.g. BE(Electronics/Mechnical)), CDAC सारखे कोर्स करा आणि घुसा आईटीत! या सर्व गोष्टीमुळे इतके लोक बाहेर पडले, की सर्वांच्या नोकरी विषयक गरजा पूर्ण करणं आईटीतील कंपन्याना अवघड होऊन बसलं! आणि दरवर्षी या सर्व Streams मधून बाहेर पडणारी मुले बेरोजगार झाली. आता मुलाना इतके पैसे खर्चून शिकवल्यानंतर पालकांच्याही त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असणारच. त्यामुळे या बेरोजगार मुलाना आणखी टेन्शन येऊ लागतं. आणि ती खचून जातात. उमेदीच्या काळात खचून जान्याने त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतात. आणि हे सगळं का व्हावं तर त्यानी न केलेल्या चुकीबद्दल? ही भावना खूप वाईट आहे.

         मी अशा अनेक मुला-मूलीना खूप जवळून पाहिलं आहे. आता या मुलाना फ्रस्ट्रेशन येण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे त्याना इतर जागी (आईटी सोडून) काम करण्यास येणार्‍या अडचणी! आईटीत काम करू शकत नसल्याने मग अशी मुले-मुली BPO,Call Centers कडे वळतात. पण हे क्षेत्र सुद्धा या मुलाना जवळ करत नाही. कारण त्यांच्या मते, आईटीतली मुलं आईटी बूम मध्ये आल्या-आल्या तिकडे वळतात, तिथला जॉब सोडून! मग आईटीतल्या मुलानी करायचं काय? या सगळ्याला सामोरं गेल्यानंतर त्याना असं वाटू लागतं, की आपल्याला काहीच करता येत नसेल का? आणि नेमकी हीच भावना खूप मारक आहे. खरं तर सरकारने यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवं होतं, पण त्याना कुठे वेळ आहे हे सगळं बघत बसायला? आपल्याला माहीतच आहे आपलं सरकार!! तर, मला वाटतं यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आईटी च्या भूलभुलैय्या ला बळी न पडता, आपण व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळालं पाहिजे. जेणेकरून, पुढची पिढी तरी वाया जाणार नाही. आईटीचे शिक्षण पूर्ण झालेल्यानी आणि जॉब नसणार्‍यानी सुद्धा खचून जाऊ नये. डोकं शांत ठेऊन येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस ठेवावं!

 
     ठेवलंय काय त्या आईटी मध्ये...डेडलाईन जवळ आली की काम, वीकेंड्स ला काम, दिवसा काम, रात्री काम, मध्यरात्री सुद्धा काम! आणि मिळणारा मोबदला फक्त ईतराना दाखवण्या पुरता की मी ऐटीत(Sorry आईटी) आहे!!

Thursday, December 30, 2010

A New Year Resolution...

0 comments
    
      Okay, Everybody is enjoying the longest weekend of the year. Now the Christmas is over & we are heading towards an another new year i.e. 2011!
     Every single new year brings a lot of things in our life. We make some resolutions & start implementing those by the 1st day of the year. For a certain period, we'll be loyal to what we have decided to do; but after that, something goes wrong in mind & we always keep that resolution for the next year to follow.
     According to me, resolution is not the thing which we should cease in between; after thinking of implementing it. Otherwise its always better to not to think of implementing it! Because anything we stop in between, our brain starts interpreting it as a negative sign so that whenever we think of the same thing again, we'll not be sure whether it'll get completed by us or not! By the result of this, we always make fun of these kinda resolutions which had been made in the past & couldn't get implemented. And finally, a resolution remains a 'resolution', we can say!
     We have to decide something means we must be lacking of it , of course! So, why to make fun of it rather than implementing it for our own sake? Remember, following the orders of the brain is simple, but controlling the instructions of it is much difficult.
     I just wanted to say, think twice before deciding anything. Wish you a very HAPPY NEW YEAR to all of my friends, colleagues, blog-readers, critics & all those people who have brought happiness in my life. Thanks a lot for being there!!
     See you in the NEW YEAR!

Wednesday, December 29, 2010

'तो' भिकारी

0 comments
पुन्हा पहिला तो भिकारी परवा
दिमाखात निघालो होतो मी...अन् कमी झाला माझा चालण्याचा वेग
पुन्हा पुन्हा मी त्याला तिथे पहातो,
जशी सवयच लागली आहे...
मला तिकडे पाहण्याची, अन् त्याला तिथे उभं राहण्याची!
प्रत्येकवेळी तो आशाळभूत पणाने माझ्याकडे पाहतो
अन् मी तसाच निघून जातो
त्याला माहीत आहे, मी रोज असाच निघून जाईन
पण तरीही तो माझ्याकडे पाहतो आजसुद्धा!
कधी काही बोलणे नाही, कधी हातवारे नाही
कदाचित तोसुद्धा थकला असेल...भीक मागून!!
ना खोकल्याचा त्रास वाटतो, ना तापाचे भय
ना उन्हाची तमा, ना पावसाची फिकीर
फक्त पोटातल्या आगीची तणतण...जीवघेणी!
त्याच्याकडे मी पाहतो अन् आठवतो 'तो' दिवस
ज्यावेळी मी पाण्याने भूक शमवली
पोट पाण्याने भरता आलं असतं तर किती बरं झालं असतं?
असा विचार मी फक्त एकदा केला होता,
पण त्याने आजवर कित्येकदा केला असेल?
सगळं आठवतं अन् मी पुढे सरसावतो..आपोआपच
त्याला पैसे देण्यासाठी..त्याचा चेहरा खुलतो
पैसे घेण्यासाठी तो हात पुढे करतो अन् त्याचे डोळे पाणावतात
म्हणतो दिवसभरात कोणी काही दिलं नाही...
मी गहिवरुन जातो...त्याच्या नशिबाला पाहून!
इथे एका वेळेची भ्रांत आहे लोकाना..
आणि आम्ही तीन-तीनदा खाउनसुद्धा भुकेलेले असतो!
वाटतं आणाव्यात सगळ्या काळ्या पैशाच्या तिजोर्‍या उचलून
आणि खायला घालावं अशा गरजूना
कारण..पाण्याने तहान भागते...भूक नाही!!

Wednesday, December 15, 2010

पुन्हा पेट्रोल दरवाढ!

0 comments
        आत्ताच बातमी वाचली, पेट्रोल आणखी २ रूपयानी वाढलं! लगेच ऑफीसात बोंबाबोम्ब चालू झाली. तीन-चार वर्षात सगळयाच वस्तुच्या किमती गगनाला जाउन भीडल्यात. आत्ता बाकीच्या गोष्टीचे भाव सुद्धा लगेच वाढ़ू लागतील. म्हणजे आणखी महागाई!! आधीच महागाईने मेटाकुटीला आलेल्या जनतेला आणि जरा त्रास दिला की कसं मस्त वाटत सरकारला!

         आता भाजी, किराणा, दूध, बसभाड़े, कपडे, शूज.....सगळ सगळ वाढेल. किती कमवायच आणि किती खर्चायच?? वर आणि काही बोलायच्या आत - 'आन्तरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्या तेलाचे भाव वाढल्याने.....' कायमचीच बोम्ब! आन्तरराष्ट्रीय बाजारपेठेत काय चाललय कुणाला कळतय? काहीतरी आपल द्यायच सांगून! कुणी विचारत नाही, विचारल तरी काही उपयोग नाही; सगळ नुसत अन्दाधून्द चाललय. वर आणि मिशन २०२०! २०२० मध्ये आणखी काय काय करतील माहित नाही! गरीबाना तुडवून २०२० साजरा करणार आहेत ****

सरकार चालवन्यासाठी पैसा वापरणार कुणाचा? आमचाच! आणि महागाईची झळ कुणाला? ती पण आम्हालाच!!
वर आणि टॅक्स! परवाच 'आयटी' चा फॉर्म भरुन घेतला आहे. म्हणजे आमच्याच पैशाने 'आमचीच'....! गरीब लोकाना पुर्वी एक वेळेच्या जेवनाची भ्रांत होती, आता पोटाला काहीच खायच नाही! अहो, साधे उदाहरण घ्या- वडापाव - उभ्या- आडव्या महाराष्ट्राचा आधार! ३-४ रु. ला मिळणारा वडापावसुद्धा आज ७-८ रु झाला आहे. केंद्रातल्या त्या 'बाई'च्या हातात सत्ता गेली त्या वेळेलाच आम्ही काय समजायच ते समजलं होतं! आज त्याची अंमलबजावणी होतेय, एवढच! तिने 'ते' बुजगावण (बायली) देशाच्या मुख्य पदावर बसवलंय, आणि तेच्या गोड आवाजात(तोपण बायलीच) ते देशाचा कारभार करतय. त्याचा राज्यकारभार नुसता 'कारभार'च होऊन बसलाय. घर चालवायची अक्कल नसलेल्याला देश चालवायला दिला की अस असतं!

आता या पेट्रोल वाढीचे विविध सूर उमटतील. न्युज चॅनेल्स दोन दिवस बोम्बाबोम्ब करतील, आणि परत 'ये रे माझ्या मागल्या'. झाल! परत आमच्या सारखा 'सामान्य' माणूस उठेल आणि पुन्हा आपआपल्या कामाला. दोन-तीन महिन्यात नवं बजेट येईल. आणखी एकदा ग्रुहोपयोगी वस्तुंचे भाव गगनाला भीडलेले असतील. पुन्हा तेच कट-कट-कट!!

पुन्हा काही वर्षात पुढची लोकसभा-विधानसभा...पुन्हा 'बाई' आपली कमावलेली रक्कम ओतनार, निवडणुकीला ८ दिवस दारू-मटण.....पुन्हा हिचेच सरकार सत्तेवर....पुन्हा पुढच्यावर्षी पेट्रोलवाढ! तुम्ही मरा पण आम्ही मात्र जगणार!!!


राजकीय लाभ तरी आम्हाला काही कामाचा नाही....तसा उद्देशही नाही हे सगळं लिहीण्यामागे. 'आम' आदमी सुखी राहावा, इतकंच वाटतं, म्हणून हा खटाटोप!

विचार करा एकदा सगळ्यांनी 'आमच्या' डोक्यातून.... हीच अपेक्षा!

Tuesday, December 7, 2010

चारोळ्या...

0 comments
वरंधार पावसातसुद्धा,
छोटे थेंब असतात
मोठ्या थेंबाना तेच तर,
'मोठे' बनवत असतात




मधमाश्या असेपर्यंत,
मधाच्या पोळयाला अर्थ आहे
त्यानी घर सोडल्यानंतर,
मध त्यांचे व्यर्थ आहे



आता मी चुकणार नाही,
मला सगळ उमगलं आहे
दावं सोडल्यावर गुरांची,
'काय' होतं ते समजलं आहे



कुणी कुणाला काय म्हणावे,
याचे सुद्धा नियम आहेत
लोकशाही असली तरी,
कायदे मात्र कायम आहेत

Tuesday, November 2, 2010

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !

0 comments
दिवाळीचे दिवस! दिवाळी अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपली आहे. कुणी कामे संपवून घरी जाण्याच्या नादात आहेत. कुणी खरेदी करण्यात मग्न आहेत. सगळीकडे नुसती गडबड चालू आहे. लहान मुले फटाके उडवण्याची स्वप्ने पाहतायत, स्त्रियांचा साड्या-नवीन कपडे इ.कडे कल आहे. बाजारपेठेत नवनव्या वस्तु दाखल झाल्या आहेत. पणत्या, रांगोळ्या, निरनिराळे आकाशदिवे, सौंदर्य प्रसाधने, खाण्या-पिण्याच्या गोष्टी!

तर ही आहे तुमच्या-आमच्या सारख्या लोकांची दिवाळी! प्रत्येकजण आपल्या कुवतीप्रमाणे दिवाळी साजरी करत असतो; मग त्यासाठी काही करण्याची त्याची तयारी असते. याच्या पलीकडे जाऊन अनेक लोक असे असतात, ज्यांच्या दोन वेळेच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत असते. त्याना दिवाळी सारखे सण परवडण्याच्या पलीकडे असतात. असे अनेक लोक आपल्या अवती-भवती असतात; आपण त्याना कधी आपुलकीच्या नजरेने पाहतो का? आपण त्याना अनेक छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद देऊ शकतो, पण आपल्याला अशा लोकाबद्दल काहीतरी करण्याची ओढ असली पाहिजे.

माझ्यामते, आपण जर आपल्याला त्यांच्या जागी ठेऊन पाहिलं, तर त्यांच्या मनाची आपल्याला जाणीव होईल. या जगात येण्याचा जसा प्रत्येकाला हक्क आहे, तसा हे जीवन इतरांसारखे जगन्याचाही आहे. थोडाफार पैसा आपल्याकडे असला म्हणजे आपण सुखात जगावे आणि अशा गरीब लोकाना त्यांच्या दैवावर सोडून द्यावे हे कितपत योग्य आहे? त्यानाही मने आहेत, अन् त्याना सुद्धा आपल्यासारखे सण साजरे करण्याचा अधिकार आहे. आपण जर त्याना आपल्या आनंदात सामावून घेऊ शकलो, तर किती बरे होईल? आणि मानवतेचा पुरस्कार करत साजरी केलेली दिवाळीच खरी नाही का? विचार करा, आणि निदान एका तरी कुटुंबाला-जे दिवाळी साजरी करु शकत नाहीत, त्याना थोडा हातभार लाऊन त्याना सुद्धा आपल्या आनंदात सामावून घ्या हीच या दिवाळीला तुम्हा सर्वाना विनंती!

ही दिवाळी आपल्या सर्वाना सुखाची-समृद्धीची आणि भरभराटीची जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!