का थांबली तू अशी आज वेडे
पाउल का तुझे हे उगा धडपडावे!
नाही फसविले तू कधी ना कुणाला
कुणाच्या जिवाची तुज सांग चिंता?
ज्याला असे ना पर्वा दु:खाची
का मग तुला ही भीती भेडसावे?
अंतरीच्या सगळया गाठी सोडताना
नव्हता न कसला विचार ठायी,
का मग कुणाच्या हातात हात
देताना तुजला मी न आठवावे?
दिलेली ती वचने अन् बाकी सारे
नसशील का तयांचा कधी विचार केला,
कुठल्या क्षणी मग सांग आज मजला
सुचले स्वप्न तुजला मला सोडण्याचे?
कुणाच्या सुखाचे कुणाला न् नसते
म्हणायचीस मजला कधी कोणे-काळी,
म्हणालोही तुजला नसते असे हे,
परी आज तेच माझ्यावरी ओढवावे?
Wednesday, March 17, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment