भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Saturday, April 3, 2010

नको जाऊ सोडून मजला, ती म्हणाली आज...

अंतरीच्या हृदयाने साद घातली आज,
नको जाऊ सोडून मजला, ती म्हणाली आज...       ||धृ||

मन हे झाले लुळेपांगळे,
तुझ्या नुसत्याच नकाराने
त्याला नवे पंख उडाया, देशील का रे सांग              ||१||


नको कुणाची साथ मजला,
कितीही असेल अर्थ तिजला
या प्रेमाची शपथ सांगते, सोडू नको ही साथ           ||२||


दाखविले मज जग हे जे तू,
कशी जगू त्या-विना बोल तू?
तुझाच होता-तुझाच आहे, आजही मजला ध्यास   ||३||


नव्हतेच यायचे मजकडे जर,
का लाविला लळा हा सुंदर
त्याच-त्या आठवणीने होते, आजही मी बेभान     ||४||


कुणाकडे पाहून जगावे,
स्वत:ला फक्त स्वत:च उरावे
कुणाच्याही शब्दाने न होतो, तुझाच तो आभास    ||५||


कधी जडली सवय कळेना,
कर्णास माझ्या, तुझ्या रवाची
केविलवाणी आज काढते, त्याच रवाचा माग        ||६||


सरता सरेना सांज आज ही,
उगाच राहते मनी आस ही
कधी कोणत्या सांजेला तू, देशील मजला हाक      ||७||

0 comments: