करतो-करतो म्हणून कधी पाठ फिरवायची नसते,
पाठ फिरवून पुन्हा वाट बघायची नसते
प्रत्येकाला वेळ नेहमी साथ देत नसते,
वेळ आल्याशिवाय कधी कुणाची 'बात' बनत नसते
वेळ आली की मात्र, मागे फिरायचे नसते
पाठ फिरवून पुन्हा....
दोन्ही दगडावर पाय ठेऊन चालता येत नसते,
चालताना तोल गेला तरी कळत नसते
स्वत:च्याच नावाने मग, बोंब ठोकायची नसते
पाठ फिरवून पुन्हा....
वाट्याला आलेले कधी सोडायचे नसते
नशीबात नसलेले कधी मागायचे नसते
आपल्याच दु:खाचे, कीर्तन करायचे नसते
पाठ फिरवून पुन्हा....
झालेल्या चूकांतून शिकायचे असते
दुसर्याला चुकताना सावरायचे असते
चूक करुन हात वर करायचे नसते,
पाठ फिरवून पुन्हा....
Thursday, April 8, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
0 comments:
Post a Comment