भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Tuesday, January 11, 2011

बेरोजगारांची "आईटी"!

         परवाच एक मित्र भेटला. काही दिवसापूर्वी मला त्याने त्याचा Resume Forward केला होता. मी काही करू शकलो नाही त्याच्यासाठी, पण असच बोलणं सुरू होता आमचं या विषयावरती. 'किती दिवस बसून राहायचं असं', हा ओघ त्याच्या बोलण्यातून मला जाणवला होता. मी असाच विषय-परिवर्तन करण्यासाठी काही इतर विषय काढले, पण शेवटी काही त्याच्या बोलण्यातून 'जॉब'चा विषय जाईना! मग मी सुद्धा त्याच विषयावरती बोलू लागलो.
      
         IT Sector मध्ये काम करायला लागून मला चार वर्षे झाली, आणि IT तील Recruitment सुद्धा मी जवळून पाहिलेलं आहे, पाहत आहे. आपल्याकडे (India) Software मध्ये नोकर्‍यांची इतकी वानवा का निर्माण झाली? त्याला सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपल्या पालकांची मानसिकता! आपल्या देशात लोकाना एक सवय आहे; कुणीतरी काही तरी केलं आणि त्यामध्ये यशस्वी झालं रे झालं, की लगेच आपापल्या पाल्याना तोच अभ्यासक्रम करण्यासाठी 'भाग पाडायचे'!  मी 'भाग पाडायचे' एवढ्यासाठी म्हटलं कारण आपल्या इथे जास्तीत जास्त (सगळे नव्हे) पालक आपल्या पाल्यावर अभ्यासक्रम 'लादत'च असतात. मग नाइलाजास्तव मुलं कशीबशी तो पूर्ण करतात आणि जॉब करायला बाहेर पडतात.

         चार-पाच वर्षांपूर्वी IT मध्ये अशी काही बूम आली, की उठला-सुठला ITच च. शिक्षण घेऊ लागला. मग कॉलेजेसची डोनेशन्स सुद्धा वाढली. खास आईटी साठी कोटा वाढु लागला. आणि इथेच माशी शिंकली.  जो तो आईटी साठी मरू लागला. ईर्षाच चालू झाली आईटीत कामे करण्याची! ईतकेच नव्हे, तर मूलीना स्थळे पाहतनासुद्धा पालक आईटीतील मुलाचाच हट्ट धरू लागले. याचंच रुपांतर भल्या मोठ्या बेरोजगारीत झालेलं आपल्याला आज दिसतय.

         आज आईटीत काम करण्यासाठी लागणार्‍या eligibility criteria मध्ये समाविष्ट केलेले अभ्यासक्रम असे आहेत... BE(Computer Science & IT), Diploma(CS & IT), BCA,BCS,MCA,MCS,BSc(Comp),MSc(Comp),MBA(IT)! आणखी हे सर्व सोडून तुम्ही कोणत्याही शाखेचे इंजिनियर असाल (e.g. BE(Electronics/Mechnical)), CDAC सारखे कोर्स करा आणि घुसा आईटीत! या सर्व गोष्टीमुळे इतके लोक बाहेर पडले, की सर्वांच्या नोकरी विषयक गरजा पूर्ण करणं आईटीतील कंपन्याना अवघड होऊन बसलं! आणि दरवर्षी या सर्व Streams मधून बाहेर पडणारी मुले बेरोजगार झाली. आता मुलाना इतके पैसे खर्चून शिकवल्यानंतर पालकांच्याही त्यांच्याकडून काहीतरी अपेक्षा असणारच. त्यामुळे या बेरोजगार मुलाना आणखी टेन्शन येऊ लागतं. आणि ती खचून जातात. उमेदीच्या काळात खचून जान्याने त्यांच्या मनावर खूप खोलवर परिणाम होतात. आणि हे सगळं का व्हावं तर त्यानी न केलेल्या चुकीबद्दल? ही भावना खूप वाईट आहे.

         मी अशा अनेक मुला-मूलीना खूप जवळून पाहिलं आहे. आता या मुलाना फ्रस्ट्रेशन येण्याचं आणखी एक मोठं कारण म्हणजे त्याना इतर जागी (आईटी सोडून) काम करण्यास येणार्‍या अडचणी! आईटीत काम करू शकत नसल्याने मग अशी मुले-मुली BPO,Call Centers कडे वळतात. पण हे क्षेत्र सुद्धा या मुलाना जवळ करत नाही. कारण त्यांच्या मते, आईटीतली मुलं आईटी बूम मध्ये आल्या-आल्या तिकडे वळतात, तिथला जॉब सोडून! मग आईटीतल्या मुलानी करायचं काय? या सगळ्याला सामोरं गेल्यानंतर त्याना असं वाटू लागतं, की आपल्याला काहीच करता येत नसेल का? आणि नेमकी हीच भावना खूप मारक आहे. खरं तर सरकारने यासाठी काहीतरी पाऊल उचलायला हवं होतं, पण त्याना कुठे वेळ आहे हे सगळं बघत बसायला? आपल्याला माहीतच आहे आपलं सरकार!! तर, मला वाटतं यासाठी आपणच काहीतरी केलं पाहिजे. आईटी च्या भूलभुलैय्या ला बळी न पडता, आपण व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळालं पाहिजे. जेणेकरून, पुढची पिढी तरी वाया जाणार नाही. आईटीचे शिक्षण पूर्ण झालेल्यानी आणि जॉब नसणार्‍यानी सुद्धा खचून जाऊ नये. डोकं शांत ठेऊन येणार्‍या परिस्थितीला सामोरे जाण्याचं धाडस ठेवावं!

 
     ठेवलंय काय त्या आईटी मध्ये...डेडलाईन जवळ आली की काम, वीकेंड्स ला काम, दिवसा काम, रात्री काम, मध्यरात्री सुद्धा काम! आणि मिळणारा मोबदला फक्त ईतराना दाखवण्या पुरता की मी ऐटीत(Sorry आईटी) आहे!!

2 comments:

Onkar Danke said...

.IT ची बूम वाढल्यानंतर अगदी गावोगावी त्याचे कॉलेज सुरु झाली. यामुळे अगदी गल्लीबोळात it पदवीधर तयार झाले. त्यांचा पुरवठा वाढल्यानेच या पदवीधरांची मागणी आता घटली आहे.

आशिष देशपांडे said...

हो ना ओंकारजी! असो, ब्लॉगला भेट देऊन वेळ दिल्या बदद्ल धन्यवाद!!