भोगले जे दुःख त्याला, सुख म्हणावे लागले
एवढे मी भोगिले की मज हसावे लागले

- सुरेश भट

Saturday, April 3, 2010

कधीतरी पुन्हा मला भेटशील का?

भुकेल्या दुपारी विचार थांबलेले,
उदास मन झाले तुझ्या आठवणीने
कधीतरी पुन्हा मला भेटशील का?

आसक्ति भावनांची मनात दाटलेली,
फुले तीच आज पथावर सांडलेली
फुलांना विचारून पाहशील का,
कधीतरी पुन्हा मला......

वात हा वेडा घोंघावू लागला,
कधी माझ्या भावनांशी स्पर्धा करु लागला
भावनांशी सरस तो होईल का,
कधीतरी पुन्हा मला......

पहुडलो पिंपळाच्या छायेखाली,
होती आस-रहावं मायेखाली
तुझ्या मायेचा भास इथे होईल का?
कधीतरी पुन्हा मला......

विचारपूस करते नदी जवळील,
एकटा तू आज का, मला सांगशील?
आहे मी निरुत्तरी, उत्तर तू देशील का,
कधीतरी पुन्हा मला......

खिशातील चित्र तुझे काढतो हळूच,
आस मनी फक्त तुला पहाण्याची जणूच
'आस' ही 'भास' नाही, म्हणशील का,
कधीतरी पुन्हा मला......

ढळू लागली दुपार, सांज होऊ लागली,
किरणे ही अपार लोप पावू लागली
किरणांसारखी उद्या पुन्हा येशील का,
कधीतरी पुन्हा मला......

2 comments:

Unknown said...

आशिष, कविता खरोखर फारच छान झालीय.गेय आहे.
http://savadhan.wordpress.com

आशिष देशपांडे said...

सावधान,
धन्यवाद! मी तुमचा ब्लॉग सुद्धा पाहिला...छान लिहिता आपण. एक गोष्ट सांगाविशी वाटते, आपण ब्लॉग वरती आपलं नाव कुठेही लिहिलं नाही...असो, पण लेख मात्र अतिशय छान आहेत!